दिशा संस्थेतर्फे शाळांना साहित्य वाटप
वडगाव मावळ:
दिशा संस्था शाळेतील मुलांसाठी वाचन,हास्तकला, छंदवर्ग व मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा यांसाठी वेगवेगळे उपक्रम व स्पर्धा वांरवार घेत असते. तसेच शाळेतील शिक्षकांच्या येणार्‍या वेगवेगळ्या मागण्याचा देखील विचार करते.
दिशा संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर रघुनाथ जटार व संस्थेच्या विश्वस्त इंदू गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रविण भोईरकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडिवळे, वळक, बुधवडी, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी व कातकरीवस्ती या ८ शाळांना टेबल, आफिस कपाट, ग्रंथालय कपाट व खुर्च्या या साहित्याचे वाटप केले.
या कार्यक्रमाला त्र्यंबक आहेर ञ्यंबक, शिंदे अंकुश सर, जयश्री कांबळे मॅडम, प्रगती माच्छी मॅडम, नेहा वाघदरे, प्रिती टाकळकर व स्नेहल थोरवे उपस्थित होत्या.

error: Content is protected !!