तळेगाव दाभाडे:
तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक 4 मधील निगडे एम.आय.डी.सी.येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व 32 (1) तत्काळ लागू करून आंबळे येथील 32(1 ) चे पेमेंट वाटप करावे या प्रमुख मागण्यांसाठी आज वाकडेवाडी येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या प्रादेशिक कार्यालवावर शेतकरी कृती बचाव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चास भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने पाठिंबा देत सहभागी होऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी संदेशजी शिर्के साहेबांनी आंदोलन स्थळी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत निवेदन स्वीकारले.
संदेश शिर्के यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी जोपर्यंत शासन शेतकऱ्यांच्या वरील मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत व शासनाच्या वतीने शिर्के साहेबांनी दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण केले नाही तर याच ठिकाणी येणाऱ्या काळात प्रचंड मोठ्या जनआक्रोश आंदोलनाला शासनाला सामोरे जावे लागेल असा इशारा या आंदोलनाच्या निमित्ताने देण्यात आला..!
याप्रसंगी प्रभारी भास्करराव म्हाळसकर,मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविंद्र भेगडे,माजी.सभापती गुलाबराव म्हाळसकर,शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष शांताराम कदम,गणेश भांगरे,गणेश कल्हाटकर,शंकर भांगरे यांच्यासह शेतकरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!