वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना ट्रॅप कॅमेरा भेट
वडगांव शहर भाजप चा स्तुत्य उपक्रम
वडगाव मावळ:
वन्यजीव मोजणी, प्राणी पुनर्मिलन, प्राणी बचाव डेटा, संशोधन प्रकल्प यांसाठी अत्यंत उपयुक्त असणारा ट्रॅप कॅमेरा वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना भेट देण्यात आला.
भारतीय जनता पार्टी , वडगांव शहराच्या माध्यमातून
व स्वीकृत नगरसेवक भूषण मुथा यांच्या सौजन्याने मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते आणि मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर , अखिल भारतीय वारकरी मंडळाचे वडगांव शहराध्यक्ष नारायणराव ढोरे, वडगांव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे , नगरसेवक प्रवीण चव्हाण , अ‍ॅड.विजयराव जाधव , प्रसाद पिंगळे , रविंद्र काकडे , मा.उपसरपंच सुधाकर ढोरे ,शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष शेखर वहिले , मावळ विचार मंचाचे अध्यक्ष शंकरराव भोंडवे , मावळ विचार मंचाचे मा.अध्यक्ष अ‍ॅड.अजित वहिले , वडगांव शहर भाजपा अनुसूचित मोर्चा अध्यक्ष दिपक भालेराव , लायन्स क्लब ऑफ वडगांव चे मा.अध्यक्ष बाळासाहेब बोरावके , हृषीकेश सुळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत भेट देण्यात आला.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे , जिगर सोळंकी , रोनक खरे यांनी हा ट्रॅप कॅमेरा स्वीकारला आणि या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
या प्रसंगी भास्करराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या कार्याचे कौतुक करत भारतीय जनता पक्ष यापुढेही मदतीसाठी सक्रिय राहील असे सांगितले.
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे वडगांव शहराध्यक्ष
नारायणराव ढोरे, नगरसेवक प्रवीण चव्हाण , नगरसेवक प्रसाद पिंगळे , स्वीकृत नगरसेवक भूषण मुथा ,शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष शेखर वहिले , वडगांव शहर भाजपा अनुसूचित मोर्चा अध्यक्ष दिपक भालेराव यांनी या उपक्रमाला मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या.
वडगांव भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी प्रास्ताविक केले व आभार प्रदर्शन विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष प्रज्योत म्हाळसकर यांनी केले.

error: Content is protected !!