वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदी जालिंदर शेटे यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते शेटे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके,मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर सातकर,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी चिटणीस विक्रम कदम ,मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले, सरपंच परिषदेचे अध्यक्ष सुनील भोगाडे,मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक राज खांडभोर,मावळ तालुका राष्ट्रवादी सहकार सेलचे अध्यक्ष नामदेव शेलार, रामजी काळे ,सरपंच सरपंच सविता बधाले, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष नरवडे,उद्योजक राहील तांबोळी आदी उपस्थित होते. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी शेटे यांची पाचव्यांदा निवड करण्यात .आली. या निवडीचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
शेटे म्हणाले,” पक्षवाढीसाठी सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहणार असून सेवादलात काम करणा-या कार्यकर्त्याची मोट बांधणार.

error: Content is protected !!