वडगाव मावळ:
छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ आणि नगराध्यक्ष मयूर ढोरे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभाग क्रमांक सतरा मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
शिवजयंती उत्सव साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाच फुटी ज्वलंत मूर्तीचे अनावरण करण्यात आले. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजनही करण्यात आले होते. नगराध्यक्ष मयूर ढोरे, जेष्ठ नेते मंगेश ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रभागातील ६३ नागरिकांनी रक्तदानाचा हक्क बजावला सर्व रक्तदात्यांना शिवप्रतिमा भेट देण्यात आल्या.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षाच्या कालांतराने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज नगर मधील मुख्य रस्त्याने पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत व शिवरायांचा जयजयकार करीत मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत युवक व महिला भगिनींची उपस्थित लक्षणीय होती. यावेळी छत्रपती संभाजी महाराज नगर मधील विविध सोसायटी मधील महिला भगिनींनी मिरवणुकीचे स्वागत करत महाराजांच्या मुर्तीचे विधिवत पूजन केले. शिवजयंती निमित्ताने पन्नास फूट उंचीचा कायमस्वरूपी शिवछव्ज लावण्यात आला आहे.
यावेळी मा. ता. माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे, मंगेशकाका ढोरे, मुख्याधिकारी डॉ जयश्री काटकर, उपनगराध्यक्ष पुनम जाधव, नगरसेवक राजेंद्र कुडे, मोरया महिला प्रतिष्ठान च्या अध्यक्ष अबोली ढोरे, कार्याध्यक्ष चेतना ढोरे, उपाध्यक्ष प्रतिक्षा गट, युवा उद्योजक युवराज ढोरे आणि छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते, मोरया महिला प्रतिष्ठान च्या संचालिका, प्रभागातील स्थानीक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांयकाळी शिवव्याख्याते विनायक दारवटकर यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना आपल्या शिवशैलीने मंत्रमुग्ध करत मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांची रहाणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती. आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी महाराजांनी केल्या.
शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहीजे. पण एव्हढ्यावरच थांबुन उपयोग नाही. शिवरायांच्या ठायी असलेली चिकाटी जर आपण आपापल्या क्षेत्रात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला अठरा पगड समाज पुढे जाईल. महापुरुषांचं जगणं आणि विचार समजून घेतले की सर्वसामान्यांच्या आयुष्यातही क्रांती घडून येते.

error: Content is protected !!