टाकवे बुद्रुक:
छत्रपती शिवाजीमहाराजांनी संघटनेच्या बळावर रयते राज्य स्थापन केले. स्वराज्यात स्त्रीशक्तीचा प्रचंड आदर व मानसन्मान होता,हाच विचार धरून आजची तरूण पिढी सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे.माता भगिनींना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून घेतलेला हा स्तुत्य उपक्रम आहे,असे गौरवोद्गार मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी काढले.
टाकवे बुद्रुक येथे शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवात खांडगे बोलत होते. नगरसेवक गणेश काकडे,सरपंच भूषण असवले, मावळ तालुका युवक चे ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष कैलास गायकवाड, राजू खांडभोर,शिवाजी असवले,स्वामी जगताप,योगेश मोढवे याच्यासह व्यासपीठावर बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते.
खांडगे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल फटाक्यांची अतिष बाजी करीत स्वागत करून सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!