जिल्हा दूध संघात राष्ट्रवादीचे वर्चस्व
मावळ मतदार संघातून बाळासाहेब नेवाळे विजयी
पुणे:
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत १६ जागापैकी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने १४ जागांवर विजय मिळविला आहे. यामुळे कात्रज डेअरीवर पुन्हा घड्याळाचाच गजर झाला आहे. उर्वरित दोन जागांपैकी एका जागेवर काँग्रेसने, तर दुसऱ्या जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे.
बाळासाहेब नेवाळे,विष्णू हिंगे,गोपाळ म्हस्के, दिलीप थोपटे, बाळासाहेब खिलारी , केशरबाई पवार,भगवान पासलकर , गोपाळ म्हस्के,कालिदास गोपाळघरे, राहुल दिवेकर,स्वप्नील ढमढेरे, अरुण चांभारे,लता गोपाळे (महिला राखीव), भाऊ देवाडे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), निखिल तांबे (विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघ), मारुती जगताप (पुरंदर) आणि चंद्रकांत भिंगारे दूध संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

error: Content is protected !!