वाकसई:
जगदगुरू श्री.संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान सेवा ट्रस्ट,वाकसई येथील अखंड हरिनाम सप्ताहयाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जयेश महाराज भागवंत याचे काल्याचे किर्तन झाले.
या सोहळ्यास मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,कार्याध्यक्ष दिपक हुलावळे,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे,जिल्हा परिषदचे माजी सदस्य मिलींद बोत्रे,मावळ दिंडी समाजाचे अध्यक्ष नरहरी केदारी,भरत येवले,तानाजी पडवळ,अमोल केदारी , विलास विकारी, सुभाष भानुसघरे, सहदेव आरडे, पांडुरंग वारींगे, दिलीप खेगरे, प्रविण केदीरी, संतोष घनवट,काळूराम मालपोटे,दिलीप खेंगरे , अंकुश चव्हाण, यांच्यासह वैष्णव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी गणेश वसंतराव खांडगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सुभाषराव भानुसघरे यांनी सुत्रसंचालन केले.

error: Content is protected !!