
पुणे:
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने भोयरे, ता. मावळ ग्रामपंचायतीच्या प्रमिला मारुती सुळके यांचा
आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरव करण्यात आला. सुळके यांनी ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत अभियान, शैक्षणिक गुणवत्ताविकास, स्वच्छ पाणी पुरवठा, उत्तम आरोग्य तसेच इतर विकास योजना चांगल्याप्रकारे राबवून गावातील राहणीमान उंचविण्यास सर्वतोपरी विशेष प्रयत्न केलेले आहेत.
या कार्याची दखल घेत सुळके यांच्या नावावर प्रशासकीय पातळीवर शिक्कामोर्तब झाले. सुळके या
कर्तव्य तत्परता, कार्यक्षमता, अविश्रांत मेहनत तसेच व्यापक जनसंपर्क यांच्या आधारे व शासनाच्या विविध योजना गाव पातळीवर योग्यप्रकारे राबविल्या आणि
ग्रामपंचायत प्रशासन जास्तीत जास्त पारदर्शी आणि लोकाभिमुख करण्यास योगदान दिल्याबद्दल आपणास आदर्श ग्रामसेवक म्हणून गौरविण्यात येत असून मानपत्र
व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येत असल्याचे या सन्मानपत्रात म्हटले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे आयुष प्रसाद भा.प्र.से.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पुणे रणजीत शिवतारे
उपाध्यक्षपुणे जिल्हा परिषद, पुणे, सचिन घाडगे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर, गटविकास अधिकारी सुधीर भागवत,सरपंच बळिराम भोईरकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
- कोथुर्णे घटनेतील नराधमाला फाशी द्या; या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आमरण उपोषण
- महिला अत्याचार रोखण्यासाठी संसदेत कडक कायदा करावा :छत्रपती संभाजीराजे
- उत्कृष्ट मंडल अधिकारी पुरस्काराने माणिक साबळे सन्मानित
- कोथुर्णे मावळ येथील पिडीत कुटुंबीयांची न्यायालयीन लढ्यासाठी स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने २५ हजार रुपयांची मदत
- माजी सरपंच सुदाम वाडेकर यांचे निधन



