
नवलाखउंब्रे:
नवलाखउंब्रेतील युवा उद्योजक व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते नवनाथ तानाजी पडवळ यांच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते पार्थदादा पवार,माजीमंत्री मदन बाफना,राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त वही वाटप करण्यात येणार आहे.
त्याचे प्रकाशन आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, माजी सरपंच प्रभाकर पडवळ सोपान नरवडे ,रा कॉ पार्टी मावळ कार्याध्यक्ष शिवाजी असवले ,युवक अध्यक्ष रा कॉ कैलास गायकवाड ,आंदर मावळ रा कॉ अध्यक्ष बळीराम मराठे उपस्थित होते .
मावळ मध्ये ५००० शालेय वह्यांचे वाटप नवनाथ पडवळ करणार असल्याचे सुदाम भाऊ कदम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पै.नवनाथ पडवळ यांनी सांगितले.
- कोथुर्णेच्या पिडीतीला न्याय कधी?आमदार सुनिल शेळके विधी मंडळात कडाडले
- कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार असल्यामुळे नागरिकांची प्रवासा दरम्यान होणार तारांबळ
- आढले बुद्रुक येथे ३६ फूट ध्वज स्तंभाचे अनावरण
- विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने शिरगावात शेतकऱ्याचा मृत्यू
- पर्वती माणकु काळे यांचे निधन



