वडगाव मावळ:
विधी मंडळात निवडून गेल्यावर विद्यार्थी म्हणून शिकलो. लोकनेते यशवंतराव चव्हाण व लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या पुरोगामी विचार स्वीकारला.या पुरोगामी विचाराची कास पन्नास जोपासली.पक्ष कार्याच्या तपस्थेचे फळ म्हणून पुणे स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषद बिनविरोध संधी मिळाली,असा अनुभव पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी व्यक्त केला.
माजीमंत्री मदन बाफना व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव यांच्या वाढदिवसानिमित्त व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी गणेश खांडगे यांची निवड झाल्याबद्दल आमदार सुनिल शेळके यांच्या संकल्पनेतून मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात भेगडे बोलत होते.
राजकारणात निष्ठेला महत्त्व आहे,ही निष्ठा वाढवून राजकारणातील आनंद मिळावा असा सल्ला माजी मंत्री मदन बाफना यांनी दिला.
कामाचे श्रेय राष्ट्रवादीला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले पाहिजे. घरात मिरची भाकरी खायची अन बाहेर रूबाबात रहायचे.हाच रूबाब राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचा विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी दिला.राष्ट्रवादी गाव संपर्क अभियानात गावाची मागणी असेल ती पूर्ण करण्याची ग्वाही आमदार सुनिल शेळके यांनी केली.
माजी आमदार कृष्णराव भेगडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश चौधरी,माजी उपनगराध्यक्ष अशोक भेगडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे,राष्ट्रवादीच्या
महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, नगरसेवक व तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे,नगरसेवक सुनिल ढोरे, नगरसेवक
लोणावळा महिला शहराध्यक्ष मंजूश्री वाघ, नगरसेविका माया चव्हाण, वैशाली दाभाडे,सुभाष राक्षे,नरेंद्र ठाकर,तुकाराम भोडवे, जिल्हा युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले, प्रदेश माजी चिटणीस विक्रम कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असून नवा जुना हा पक्षीय कार्यकर्त्याचा भेद नाही. राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्याला सन्मानाने,ताठ मानेने मिरवता येईल अशी आपली संघटना असेल. घर तेथे कार्यकर्ता,आणि गाव तेथे राष्ट्रवादी ‘ही थीम घेऊन आपण जात आहोत. जिथे पक्षाच्या नामकरण फलकाला कधी कधी विरोध झाला आणि त्या सर्वाच्या डोळया समोर मावळ तालुक्यातील गावागावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे उद्घाटन ही होईल आणि नामकरण फलकाचे अनावरण करण्यात येईल.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,” वडीलधा-यांचे आशीर्वाद पाठीशी असावे. तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना केलेल्या कामांचे कौतुक ज्येष्ठांकडून होते. राष्ट्रवादीत स॔धी दिली जाते हे मी अनुभवले. पक्ष संघटनेशी मी वेळ देणार आहे. मावळच्या विकासाठी ९६० कोटी निधी मिळाला. लवकरच १००० कोटीचा टप्पा पार करणार आहे. अभियानांतर्गत गावाची मागणी पूर्ण करणार. पाणी पुरवठा योजना तुम्ही सात योजना मंजूर केल्या आम्ही सत्तर योजना आणल्या.
बबनराव भेगडे म्हणाले,” पक्ष संघटनेचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभा राहून पाठबळ दिले जाईल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याशी खूप प्रेम दिले. कार्यकर्त्यांना दिलेल्या जबाबदा-या त्यांनी पार पाडल्या.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी
साहेबराव कारके कार्याध्यक्ष पदी, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदी किशोर सातकर यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी प्रास्ताविक केले. राज खांडभोर यांनी सुत्रसंचालन केले. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत यांनी आभार मानले.

error: Content is protected !!