टाकवे बुद्रुक :
येथे शिवजयंती उत्सवानिमित्त लोहगड ते टाकवे असे शिवज्योतीचे सकाळी दहा वाजता आगमन होईल. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवपुतळ्याचे पुजन करण्यात येईल.
महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने यंदा सोमवार (दि. २१) रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत प्रथम पाच क्रमांकामध्ये येणाऱ्या महिलांसाठी विशेष बक्षिसे देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार असून स्पर्धेच्या माध्यमातून विविध बक्षिसे जिंकण्याची मोठी संधी महिलांना मिळणार आहे.
फ्रीज,वाशिंग मशिन,एलईडी टिव्ही,कुलर मोबाईल हँडसेट अशी बक्षीसे देण्यात येणार आहे.
‘लकी ड्रॉ’ मध्ये मिक्सर, टेबलफँन, वॉटर फिल्टर, इस्त्री, शेगडी गँस आदी बक्षिसे स्पर्धकांना मिळणार आहे.
सांयकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत खेळ रंगला पैठणीचा व रात्री ९ ते ११ मनोरंजनाकरीता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.

error: Content is protected !!