पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्ष पदी राजेश गायकवाड
वडगाव मावळ:
मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड यांची पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.राजेश गायकवाड हे गेली २७ वर्षे मुख्याध्यापक पदावर काम करीत आहे.
वरसुबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव खुर्द येथील मुख्याध्यापक असलेले गायकवाड गेली सात वर्षे मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपदाची धूरा ते संभाळत आहे.
मावळ तालुक्यातील तालूकातील.शाळा,शिक्षक,शिक्षकेतर,मुख्याध्यापक यांच्या समस्या सोडविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. प्रशासकिय कामाचा दांडगा अनुभव असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,विविध शासकीय योजनांची अभ्यासपूर्ण माहिती असणारे राजेश गायकवाड यांच्य्क कामाची पावती म्हणून जिल्हा संघात नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
गायकवाड यांच्या निवडी मुळे तालुक्यातील तमाम शिक्षक, मुख्याध्यापक शिक्षण क्षेत्रातील अधिकारी,पदाधिकारी यांचे वतीने गायकवड यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!