शिवलीत शेतजमिनीच्या वादातून बेदम मारहाण.
वडगाव मावळ :
शिवली येथे शेतजमिनीच्या वादातून ९ जणांना २० ते २५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवार (दि. १७) रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसात आज गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये रामदास सदाशिव आडकर (वय ४७, रा. शिवली ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप संभाजी आडकर, पोलीस पाटील संभाजी वाघ आडकर, नितीन संभाजी आडकर, अविनाश पंढरीनाथ आडकर, अक्षय पंढरीनाथ आडकर, संतोष गानू आडकर, नवनाथ संभाजी आडकर, योगेश दिलीप आडकर, निलेश दिलीप आडकर (सर्व रा. शिवली ता. मावळ ) यांच्यासह दहा ते पंधरा जणांवर मारहाण केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीत अतिश रामदास आडकर, रामदास सदाशिव आडकर सोमनाथ शंकर आडकर, सदाशिव गंगाराम आडकर, विनायक दिनकर आडकर, राजेंद्र वसंत आडकर ताराबाई सदाशिव आडकर, जिजा रामदास आडकर, अनुजा रामदास आडकर व नंदा शंकर आडकर आदीसह जखमी झाले.
पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सदाशिव आडकर यांच्या कुटुंबाचे भावकीसोबत जुना शेतीचा वाद होता.
होळीच्या कार्यक्रमात आरोपींनी कुरापत काढून २० ते २५ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड फावडे व दांडके घेऊन फिर्यादी रामदास आडकर यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली.
या मारहाणीत रामदास आडकर, अतिश आडकर, सदाशिव आडकर गंभीर जखमी झाले आहेत. सदर जखमींवर कान्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय तसेच तळेगाव दाभाडे येथील अथर्व हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

error: Content is protected !!