वडगाव मावळ:
छत्रपती शिवाजीमहाराज की जय!हा जयघोष अंगात वीरश्री संचारतो.अठरा पगड जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी संघटनेच्या जोरावर स्वराज्य स्थापन केले.संघटनेला ऐतिहासिक महत्व आहे,त्यामुळे तरुणांनी संघटना जोपासावी असे आवाहन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले.
वडगाव व पंचक्रोशीतील शिव ज्योत आणणाऱ्या शिवभक्तांचा सह्याद्री प्रतिष्ठान व सुनिल भाऊ ढोरे मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी खांडगे बोलत होते.
या सन्मान सोहळ्यात व्याख्याते रविंद्र यादव सर यांनी शिवरायांचा इतिहासाचे दाखले देत इतिहास उभा केला. पंचक्रोशीतील शिवज्योत आणणा-या मंडळाचा सन्मान करण्यात आला. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी गणेश खांडगे यांची निवड झाल्याबद्दल शाल,श्रीफळ,पुणेरी पगडी व शिवछत्रपतींची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश ढोरे,नगराध्यक्ष मयूर ढोरे,माजी उपनगराध्यक्ष च॔द्रजित वाघमारे, मंगेश काका ढोरे,गंगाराम ढोरे,चंदूकाका ढोरे,माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे,राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष सुनिल भोंगाडे,युवा नेते दिलीप राक्षे,माजी उपसरपंच नितीन मु-हे,चंद्रकांत ढोरे,अनिल मालपोटे,राज खांडभोर,अविनाश पाटील,शिवाजी असवले व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल ढोरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रविण ढोरे यांनी सुत्रसंचालन केले. सचिन वाडेकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!