वडगाव मावळ:
नवलाख उंब्रेच्या सरपंचपदी सविता बधाले विजयी झाल्या. मावळत्या सरपंच चैताली कोयते यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणुक घेण्यात आली. यात सविता बधाले विजयी झाल्या. सविता बधाले यांना नऊ तर प्रतिस्पर्धी उमेदवार आशा पंडित जाधव यांना चार मते मिळाली.
निवडणूक अध्यासी अधिकारी बाळासाहेब दरवडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी आशा पंडित जाधव व सविता रामनाथ बधाले यांचे दोन अर्ज आल्याने गुप्तपद्धतीने मतदान झाले. सविता बधाले विजयी झाल्या. ग्रामविकास अधिकारी प्रमिला घोडेकर यांनी निवडणूक सभेचे इतिवृत्त लिहून सहकार्य केले. सरपंच सविता बधाले यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!