
भोयरे तील महिला बचत गटांना स्टेशनरी किटचे वाटप
टाकवे बुद्रुक:
हॅण्ड इन हॅण्ड इंडिया तळेगाव (दाभाडे) संस्थेमार्फत भोयरे येथील १४ महिला बचत गटांना स्टेशनरी साहित्य किटचे वाटप करण्यात आले.
त्यामधे गणयंत्र(calculator), स्टेपलर, खोडरबर, पेनपॅक, पट्टी, व्हाइटनर, शॉपणर gluestic, व इंक pad इत्यादी रेकॉर्डसाठी आवश्यक ११ वस्तूचे वाटप करण्यात आले.
या सर्व साहित्यांचा वापर करून महिलांनी बचत गटाच्या रेकॉर्डमधे कशी अचूकता व पारदर्शता आणता येईल व संस्थेने स्थापन केलेल्या शिवशक्ती ग्रामसंघाच्या माध्यमातून महिलांनी केलेल्या बचतीतून गावात जास्तीत जास्त व्यवसाय कसे करता येईल याविषयी सारिका शिंदे मॅडम ह्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील गावचे सरपंच बळीराम भोईरकर, ग्रामसेविका प्रमिला सुळके व हॅण्ड इन हॅण्ड संस्थेच्या वतीने अभिजित अब्दुले, सारिका शिंदे, गौरी करवंदे व पंढरीनाथ बालगुडे हे उपस्थित होते.गावातील सर्व महीला बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव व गटातील सदस्य उपस्थित होते.
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप
- खांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा
- पैसाफंड शाळेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन



