कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियान
वडगाव मावळ
आरोग्य विभागाच्या वतीने १२ते १४ वयोगटासाठी व बूस्टर/तिसरा डोस ६९ वर्षापुढील सर्वांसाठी देण्याचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान सूरु करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार दिनांक १६ मार्च २०२२ पासुन *CORBEVAX* लस १२ ते १४ या वयोगटातील म्हणजेच २००८,२००९,२०१० या वर्षात जन्म असलेल्या सर्व बालकांसाठी तसेचCOVISHIELD/COVAXIN 60 वर्षापुढील सर्वांसाठी बुस्टर/तिसऱ्या डोसचे लसीकरण सूरु होत आहे.
१२ते १४ वयोगटातील सुमारे ५२०४ इतके उद्दिष्ट लसीकरणासाठी आहे. १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्याचे/ लाभार्थ्याचे लसीकरण या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष शाळेत जाऊनच सूरु करण्यात आले आहे. शाळानिहाय कृती आराखडा बनवून लसउपलब्धतेनुसार पुढील पंधरा दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल याबाबत आरोग्य विभागाने संपूर्ण नियोजन केलेले आहे
१२ ते १४ वयोगटातील पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे तसेच पालकांनी देखील मुलांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.६० वर्षावरील सर्व व्यक्तींनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभाग मावळ तर्फे करण्यात येत आहे.

error: Content is protected !!