आंबळे सोसायटी चेअरमनपदी बंडू घोजगे
आंबळे :
आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बंडू दामू घोजगे यांची तर उपाध्यक्ष पदी सिंधुबाई पंढरीनाथ शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक
कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या
निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली, त्यावेळी अध्यक्ष पदासाठी घोजगे व उपाध्यक्ष पदासाठी शेटे यांना
सर्वानुमते पाठींबा देण्यात आला. त्यामुळे घोजगे व शेटे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी आर. के. निखारे यांनी केली.
यावेळी संचालक मोहन घोलप, हनुमंत हांडे, रामदास शेटे, विलास भालेराव, मंगेश चतुर, बाबाजी वायकर, बंडू
कदम, पांडुरंग शेटे, सुलाबाई कदम, संस्थेचे सचिव दत्तात्रय वारींगे उपस्थित होते. संस्थेची पंचवार्षिक निवडणूकही बिनविरोध पार पडली आहे.

error: Content is protected !!