निगडे येथे आरोग्य जनजागृती शिबीर.
वडगाव मावळ:
येथील येथे माॅडेलिज कंपनीच्या साह्याने सेव्ह द चिल्ड्रन सेवाधाम ट्रस्ट व सेवाधाम हॉस्पिटल आणि निगडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य चिकित्सा शिबीर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन प्रथम लोकनियुक्त व आदर्श सरपंच सविता भांगरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश भांगरे मीरा भांगरे,ग्रामसेवक शशीकिरण जाधव,अर्चना भांगरे,कविता भांगरे ,राजश्री खेंगले व ग्रामस्थ उपस्थित होते .
या शिबिरामध्ये ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य विषयक समस्या ,गरोदरपणातील काळजी ,लसीकरण घेतले पाहिजे मातामृत्यू व बालमृत्यू प्रमाण कमी करता येईल. किशोरी मुलींनी आहार कुठला घ्यावा महिलांमधील रक्ताची रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी सत्त्वयुक्त आहार कसा घेतला पाहिजे या विषयी गोविंद हजारे यांनी मार्गदर्शन केले.
शिबिरामध्ये हिमोग्लोबिन व शुगर तपासणी असे ९६ महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदवला.शिबिरासाठी खैरे स्त्री रोग तज्ञ डॉ.आकाश सीमा राणे व सेवाधाम हॉस्पिटल च्या सर्व स्टाफ , आशा वर्कर योगिता शेजवळ यांनी मोलाचे योगदान दिले.

error: Content is protected !!