जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सावळा गावात बाल संरक्षण समितीची स्थापना
टाकवे बुद्रुक:
माझा बालविवाह होत असताना हे लग्न पोलिसांच्या मदतीने थांबवले गेले, मी तर वाचले पण त्या लोकांनी थोड्याच दिवसात माच्याहीपेक्षा लहान मुली सोबत लग्न केलं. – बालविवाह कुप्रथेची शिकार एक अल्पवयीन मुलीची ही व्यथा.
अनेक वेळा बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणा हव्या तेवढ्या सक्षम रीतीने काम करत नाही असे दिसते आणि त्यामुळेच समाजात देखील या कुप्रथा राजलोस पणे चालू असलेल्या आपल्याला दिसतात. या यंत्रणा सक्षम होण्यासाठी मुलांचीच ताकद वाढवली पाहिजे आणि “ज्याचा प्रश्न त्याचा आवाज” सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी Work for Equality ही सामाजिक संस्था काम करत आहे.
पुणे जिल्ह्यातील 15 वाड्या वस्त्या मधील 51 ,मुलांचे दोन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले गेले यात सावळा गावातील 10मुलींनी सहभाग घेतला होता.
या कार्यशाळेत मुलाना त्यांचे अधिकार कोणते, ते सुरक्षीत राहण्यासाठी कोण कोणत्या लोकांची मदत घेता येईल यावर माहिती दिली गेली.
याच मुलांनी त्यांच्याच गावांमधील मोठी माणसे, लहान मुले अशा खेड आणि मावळ भागातील 17 गावांमधील 221लोकांसोबत चर्चा करून बालकांच्या संरक्षणासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे बाल सुरक्षा समिती ची गाव पातळीला काय स्थिती आहे यावर अभ्यास स केला गेला.
त्यानुसार 89% लोकांनी सुरक्षा समिती नाही , 87% लोकांनी सभा होत नाहीत, 84% लोकांनी प्रतिनिधी कोण हे माहीत नाही, 40%मुलांनी अत्याचार पाहिला आहे, 68% लोकांनी अत्याचारा विषयी ऐकले आहे अशी माहिती दिली.या सर्व परिस्थितीवर आधारीत मुलांनी मागण्यांचा मसुदा तयार केला व त्यानुसार
प्रत्येक गावात बाल सुरक्षा समिती स्थापन करा व त्या सक्रिय करा, समितीच्या सभा नियमित व्हायला पाहिजे आणि गावात जर बालविवाह झाला तर सरपंच आणि सदस्यांचे पद रद्द करा. अशा मागण्या तयार केल्या.
या मागण्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सावळा गावातील गर्ल्स लीडर्स ने गावचे सरपंच, अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांना मागण्यांचे निवेदन दिले आणि त्वरीत गावात बाल सुरक्षा समिती स्थापना करून सरपंच आणि सदस्यांनी मुलांच्या संरक्षणाची ग्वाही दिली.
सावळा गावात संस्थेच्या मार्गदर्शनाने गर्ल्स क्लब स्थापन झालेला असून त्यांनीच मुलांच्या संरक्षणासाठी गावात बाल सभा घेऊन प्रश्न बाल सुरक्षा समिती पुढे आणण्याची जबाबदारी घेतली आहे.
कार्यक्रमात वर्क for equality संस्थेच्या माध्यमातून 80 महिलांना त्यांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी reusable sanetary pad che वाटप केले गेले. गर्ल्स लीडर्स अश्विनी, जयश्री,….. सदस्य सविता गारे यांनी कार्यक्रमात प्रमुख भूमिका घेतली. अशी महिती work for equality संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी दिली.

error: Content is protected !!