कामशेत:
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था अनुदानित आश्रम शाळा कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे येथील इयत्ता सातवी मुले व दहावीच्या मुलींचा शुभेच्छा समारंभ दिना उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या ॲड. वर्षाताई डहाळे जुन्नर यांनी मुलींना स्वरक्षण व संरक्षण तसेच करिअर गाईडन्स मार्गदर्शन केले. कार्यक्रमास इयत्ता नववी इयत्ता, सातवी इयत्ता, दहावी या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षक श्री. श्रीकांत बुरांडे तसेच श्री जगन्नाथ ढगे सर यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक देवरे मॅडम यांनी केले.
शाळा समिती सदस्य धनंजय वाडेकर , विक्रम बाफना, नवनाथ ठाकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या बगाड हिने केले. आभार श्री ढेरंगे सर अधीक्षक यांनी मानले.

error: Content is protected !!