पवना परीक्षा केंद्र व उपकेंद्रावर दहावी ची परीक्षा सुरळीत सुरु
पवनानगर:
राज्यभरात दहावीच्या परीक्षेला सुरवात झाली असुन मावळ तालुक्यात ही परीक्षा सुरु झाली पवना नगर केंद्रात दहावी ची परीक्षा सुरळीत सुरु झाली या कैंद्रात १४१ तर उपकेंद्र ३२८ असे एकूण ४६९ विद्यार्थी शालंन्त परीक्षा देत आहेत.
पवना विद्या मंदिर पवना नगर हे मुख्य केंद्र असून वारु-कोथुर्णे विद्यालय कोथुर्णे,भैरवनाथ विद्यालय बौर,संत तुकाराम विद्यालय शिवणे,संत ज्ञानेश्वर विद्यालय दिवड,छत्रपती शिवाजी विद्यालय शिवली,माध्यमिक विद्यालय करुंज,माध्यमिक विद्यालय आजिवली ही उपकेंद्र आहेत.
पवनानगर केंद्रांवर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मावळ कृषी उत्पन्न सभापती नंदकुमार धनवे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संजय मोहोळ,केंद्र प्रमुख पांडुरंग डेंगळे,मुख्याध्यापिका अंजली दौंडे, गोरख जांभुळकर, भरत पाठारे,वसंत तिकोणे माजी विद्यार्थी व पालक यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
तर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक व इंद्रायणी विद्या मंदिराचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या वतीने सर्व विद्यार्थांना लेखन कार्यासाठी परिक्षेसाठी पॅड व बेडसे माजी सरपंच चंद्रकांत दहिभाते यांच्या वतीने पवना केंद्रावरील आठ शळांना विद्यार्थांना मास्कचे तर ॲड भरत ठाकर प्रतिष्ठानच्या वतीने गुलाबपुष्प देण्यात आले.
तसेच परीक्षा ‘काँफी मुक्त अभियाना ‘साठी व शांततेत पार पाडण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन पोलिस निरिक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असुन दक्षता समितीचे सदस्य ही मदत करत आहे
ही परीक्षा व्यवस्थीत पार पडावी विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण न यावी या सांठी परीक्षा केंद्रसंचालिकि अंजली दौंडे, सहाय्यक निला केसकर व परीक्षा विभाग प्रमुख भारत काळे,गणेश ठोंबरे प्रयत्न करत आहे.

error: Content is protected !!