इंद्रायणी नदीपात्राची खोली वाढवण्या संदर्भात प्रस्ताव सादर करणार:मधुसुदन बर्गे
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीपात्राची खोली वाढण्यात यावी या मागणीसाठी श्री एकविरा देवी कृती समितीच्या वतीने सोमवार (दि. १४) पासून सुरू करण्यात आलेले उपोषण तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
श्री एकविरा समितीच्या वतीने भाई भरत मोरे, मिलिंद बोत्रे, विष्णू गायखे, नंदकुमार पदमुले, अरुण भानुसघरे, गुलाब तिकोने, काळूराम थोरवे, सुनील गुजर यांनी आज वडगाव मावळ येथील पंचायत समिती समोरील चौकात उपोषण सुरू केले होते.
इंद्रायणी नदीपात्र खोल करावे, इंद्रायणीत वलवण धरणाचे पाणी सोडावे, पात्र व ओढ्यालगतची अतिक्रमणे काढावीत, जलपर्णी काढावी आदी मागण्या समितीच्या माध्यमातून अनेकदा करण्यात आल्या आहेत; परंतु प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर सोमवारी उपोषण सुरू करण्यात आले होते.
मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीपात्र खोल नसल्यामुळे पावसाळ्यात नदीपात्राच्या लगतच्या शेतीचे मोठे नुकसान होते; तसेच पावसाळ्यात टाटा धरण परिसरातून पाणी सोडले मोरे यांनी सांगितले, नदीपात्र उथळ असल्याने पिकांचे नुकसान होते. पाणी इतरतर पसरले जाते. त्यामुळे पुरसदृश स्थिती निर्माण होते. पाऊस ओसरल्या नंतर पाणी वाहून जात असल्याने संपूर्ण इंद्रायणी पात्र कोरडे पडते; परंतु जर हेच नदीपात्र आपल्या
प्रशासनाकडून नदीपात्र खोल केल्यास परिसरात पुरस्थिती उद्भवणार नाही व शेतकऱ्यांचे नुकसानही होणार नाही. पाणी साचल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकांना देखील फायदा होईल त्यामुळे नदीपात्र खोल करणे ही काळाची गरज असल्याचे मोरे यांनी सांगतले.
तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी नदीपात्राची खोली वाढविण्यासाठी शासनाची मंजुरी आवश्यक असल्याने त्यासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याबाबतचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

error: Content is protected !!