मावळमित्र न्यूज विशेष:
शेतकरी…कामगार…रिक्षा चालक..ते ट्रॅव्हल्सचा मालक असा पल्ला गाठला आहे,वराळे तील मोहन मराठे या तरूणाने.प्रामाणिकपणाला कष्टाची जोड देत या तरूणाने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.त्याच्या राबणा-या हाताला परिवाराने दिलेली साथ लाखमोलाची ठरले.
सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील राहणीमान असते असेच,राहणीमान मराठे परिवाराचे. शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन. शेतीला दुध व्यवसायाची जोड देत हाताला मिळेल ते काम करायची विठ्ठल (आप्पा)मराठे यांचा मूळ स्वभाव हाच स्वभावाची री मोहन यांनी ओढली.
वराळे तील जीवन शिक्षण विद्या मंदिरात प्राथमिक शिक्षण झाल्यावर मोहनचे माध्यमिक शिक्षण तळेगाव च्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलात झाले.
दहावीच्या शिक्षणाच्या पुढे काय हा प्रश्न पुढे होताच. तशा वडीलांच्या कष्टाला हातभार लावायचा ही तळमळही होती. एचपी गॅसच्या वायूवाहिनीच्या कामात सुरक्षा रक्षक म्हणून सुरू केलेल्या कामातून प्रमाणिक पणाचा शिक्कामोर्तब अधिकच गडद झाला. वायूवाहिनीचे हे काम करताना कित्येक किलोमीटरची रोजची पायपीट अंगवळणी पडून गेली होती. तंत्रज्ञानाच्या बदलाचा एचपी कंपनीने स्वीकार केला आणि मोहनचे हातचे काम गेले.
तळेगाव चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणाने नागरीकरण वाढले. खाजगी प्रवासी वाहतुक करणा-या गाड्यांची संख्या वाढली आणि हाच व्यवसाय निवडुन मोहन आणि दिनेश या भावांनी रिक्षाचालक म्हणून काम सुरू केले. कष्टाला प्रमाणिक पणाची जोड दिल्याने दिवसागणिक यश मिळत गेले.दिवसामागून दिवस सरले आणि भरभराटीचे दिवस आले.ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाचं बस्तान बसले.
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थांना ने आण असो की,लग्न सोहळा,साखरपुडा समारंभातील वऱ्हाडी मंडळीचे येणे जाणे अश्वमेघ ट्रॅव्हल्सच्या वाहनांची मागणी वाढली.
याच व्यवसायातील संधी मराठे भावांनी हेरून त्यात स्वतःला झोकून दिले. ट्रॅव्हल्स पाठोपाठ ट्रान्सपोर्ट व्यवसायात टाकलेले पहिले पाऊल यशस्वी ठरेल. प्रापंचिक जीवनात पती पत्नी ही रथाची दोन चाके ही दोन्ही चाके एकाच गतीने धावली ही इच्छित ठिकाणी पोहचायला फारसा वेळ लागत नाही.तशी मोहन आणि जया ही मराठे परिवारातील रथाची दोन चाके आहे. ती एकाच विचाराने सतत धावत आहेत,यांच्या धावण्याला अधिक वेग येऊन सुयश प्राप्त होवो याच आजच्या वाढदिवशी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.

error: Content is protected !!