सोमाटणे येथील होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोमल विशाल भिंताडे ठरल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या मानकरी
सोमाटणे :
जागतिक महिला दिनानिमित्त आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सोमाटने गावचे विद्यमान उपसरपंच विशाल मनोहर मुऱ्हे यांनी सिने अभिनेते क्रांतीनाना माळेगावकर प्रस्तुत भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमाचे रविवारी (दि.१३) सोमाटने येथे आयोजन केले होते. कार्यक्रमात पवन मावळातील महिला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट खेळून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कोमल विशाल भिंताडे या इलेक्ट्रिक स्कूटरच्या मानकरी ठरल्या आहेत. तर लक्की ड्रॉ जिंकणाऱ्या सईद्रा रोहिदास दहिभाते या एक तोळा वजनाच्या सोन्याच्या अंगठीच्या मानकरी ठरल्या आहेत.
यावेळी आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, माजी नगरसेवक किशोर भेगडे, सुनिल दाभाडे, उद्योजक सुधाकर शेळके, दिलीप राक्षे, मनोज येवले, सरपंच अजित चौधरी, कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके गंगाताई कोकरे,राजश्री राऊत,राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, वैशाली दाभाडे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत कोमल विशाल भिंताडे या इलेक्ट्रॉक स्कुटरच्या मानकरी ठरल्या, द्वितीय क्रमांक मिळवत मोनाली बजरंग तुपे या एलईडी टीव्हीच्या मानकरी ठरल्या, तृतीय क्रमांक आलेल्या पुजा रामदास साठे फ्रीजच्या मानकरी ठरल्या, चतुर्थ क्रमांक आलेल्या ममता सुरेश शेंडगे या वॉशिंग मशीन च्या मानकरी ठरल्या, पाचवा क्रमांक मिळवत अनिता अमोल बदर या ओव्हनच्या मानकरी ठरल्या ,सहावा क्रमांक मिळवत उर्मिला बहिरट ओव्हनच्या मानकरी ठरल्या, सातवा क्रमांक मिळवत कुसुम माने या वॉटर प्युरिफायरच्या मानकरी ठरल्या.
आठवा क्रमांक मिळवत दीपाली सुतार या गॅस शेगडीच्या मानकरी ठरल्या, नववा क्रमांक मिळवत अश्विनी वाळूंकर या मिक्सरच्या मानकरी ठरल्या व दहावा क्रमांक मिळवत संपदा कर्जनकर या फॅनच्या मानकरी ठरल्या आहेत. तर लकी ड्रॉ विजेत्या सईद्रा दहिभाते या एक तोळा वजनाची सोन्याची अंगठीच्या मानकरी ठरल्या आहेत. तसेच या कार्यक्रमा दरम्यान कोरोना काळात उत्तम काम करणाऱ्या महिला डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, महिला ग्रामसेवक, महिला सरपंच, महिला शिक्षिका व विविध क्षेत्रातील महिलांनाचा सन्मान देखील करण्यात आला.

error: Content is protected !!