लोक अदालतीमध्ये वडगाव मावळ न्यायालयात सव्वा कोटी रुपये पेक्षा जास्त वसुली
वडगाव मावळ:
राष्ट्रीय महालोक अदालत वडगाव मावळ न्यायालयात आयोजित करण्यात आली होती.लोकअदलतीमध्ये पक्षकार ,वादी,प्रतिवादी, फिर्यादी,आरोपी , अर्जदार,जाबदेणार इत्यादींनी सहभाग घेऊन मधील हेवेदावे,गैरसमज दूर करुन प्रकरणे आपापसात तडजोड करावी व लोकअदालत यशस्वी करण्यासाठी पक्षकारांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.व्ही.डी.निंबाळकर साहेब व तालुका विधी व सेवा समिती अध्यक्ष सी.आर.उमरेडकर यांनी केले होते, त्या आवाहानाला पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिला.
लोकअदालतीचे उद्घाटन मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश व्हि.डी.निंबाळकर यांचे हस्ते झाले.त्यावेळी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पी.जी.देशमुख ,दिवाणी व फौजदारी न्यायाधिश उमरेडकर ,कातकर बर्गे ,सुर्यवंशी,पाटील , वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.मच्छिंद्र घोजगे, उपाध्यक्ष अविनाश पवार ,ॲड.धनंजय कोद्रे, सचिव सुधा शिंदे ,मा.अध्यक्ष ॲड.विठ्ठल पिंपळे मा.अध्यक्ष ॲड.एस्.जी.बवरे,ॲड.शैलेष घारे ॲड.शिराळकर,ॲड.काळे,ॲइ. शितोळे, ॲड.शैलेष पडवळ , ॲड.निलेश हांडे, ॲड.प्रशांत दाभाडे व अनेक वकिल उपस्थित होते.
महालोकअदालतीमध्ये एकुण ५०१ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली .त्यामधून सूमारे १ कोटी२६ लाख ८१हजार १९ रुपयांची वसुली झाली. तसेच दिवाणी व फौजदारी खटले निकाली काढण्यात आले.अशी माहिती तालुका विधी व सेवा समितीच्या अध्यक्षा न्यायाधिश मा.उमरेडकर साहेब व वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.मच्छिंद्र घोजगे यांनी दिली.

error: Content is protected !!