कार्ला :
शिवसेनेत महिलांना नुसता मानसन्मानच नाही तर संपूर्ण अधिकार दिला जाईल असे वरसोली येथे झालेल्या मावळ तालुका शिवसेना मेळाव्यात संपर्कप्रमुख सचिन आहेर यांनी जाहीर केले.मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने आगामी लोणावळा,तळेगाव नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता,यावेळी ते बोलत होते.
आहेर म्हणाले,” शिवसेनेचा मंत्री ,खासदार यांच्या माध्यमातून मावळ तालुक्याला मोठा निधी मिळत आहे.मावळ तालुका पर्यटन श्रेत्राचा विकासासाठी युवासेनाप्रमुख तथा पर्यटन मंत्री,आदित्य ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे.
मावळ तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी यांनी आपली जबाबदारी ओळखून तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे.तसेच सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी खासदार बारणे म्हणाले,” ,महाविकास आघाडीचे सरकार जरी असले तरी मुख्यमंत्रीपदी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे असून ते करत असलेल्या कामाचा आपण आदर्श घेतला पाहीजे.कोरोना काळात देशात सर्वाधिक काम उध्दवसाहेबांनी केले.
जनतेला धीर देण्याबरोबरच कुठलीही मदत कमी पडु दिली नाही.सरकार मध्ये आपले अस्तित्व मोठे आहे,हेच अस्तित्व तालुक्यातील शिवसैनिकांनी जपावे,शंभर कोटीच्या पुढे तालुक्यात सरकारच्या व खासदार निधीच्या माध्यमातून कामे करण्यात आली आहे.असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
यावेळी तालुका संपर्क प्रमुख गणेश जाधव,महिला संपर्क प्रमुख लतिका पाश्ते,उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे,राजेश पळसकर यांनीही शिवसैनिकांना संबोधित केले तालुकाप्रमुख राजेश खांडभोर,महिला जिल्हा संघटक शैला खंडागळे,महीला उपजिल्हाप्रमुख वैशाली मराठे,महिला आघाडी संघटिका अनिता गोणते,मावळ तालुका संघटक सुरेश गायकवाड,अंकुश देशमुख,युवासेना समन्वयक अनिकेत घुले, डॉ.विकेश मुथा ,लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक,नगरसेवक शिवदास पिल्ले नगरसेविका कल्पना आखाडे ,सिंधू परदेशी ,तळेगाव शहरप्रमुख दत्तात्रय भेगडे,उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे,यशवंत तुर्डे ,देहूरोड शहर चे भरत नायडू ,सावित्रीबाई फुले विधापीठ कक्षाचे उपाध्यक्ष विशाल हुलावळे,धनंजय नवघणे,रमेश जाधव, दत्ता केदारी,विजय तिकोणे,एकनाथ जांभुळकर ,देव खारटमल ,किसन तरस ,सोमनाथ कोंडे,सुनील येवले ,अशोक निकम, राम सावंत,युवराज सुतार ,रंगनाथ गोपाळे, उमेश दहीभाते , नितिन देशमुख, सिध्द नलवडे, जयदेव ठाकर, रमेश नगरक,र अनंत आंद्रे ,नितिन पिंगळे,रोहिणी मुथा, उषा इंगवले , मनीषा भांगरे, संगीता कंधारे, देवकर, रुपाली आहेर ,संतोष गिरी ,सागर हुलावळे , संतोष बोबले, तानाजी सूर्यवंशी, संजय भोईर, मनेश पवार ,उमेश गावडे, संदीप शिंदे, संजय भोईर आनयी बंधु भगिनी उपस्थित होते.तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी प्रास्ताविक केले . सूत्रसंचालन मदन शेडगे यांनी केले.

error: Content is protected !!