वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी गणेश खांडगे यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांची निवड केली.
आमदार सुनिल शेळके,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी
मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अविनाश पाटील, संचालक राज खांडभोर, संजय बाविस्कर, माजी युवकचे अध्यक्ष संतोष मुऱ्हे, सचिन मु-हे ,प्रदेश चिटणीस विक्रम कदम, माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले उपस्थित होते. खांडगे यांची अध्यक्ष पदी निवड जाहीर होताच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव केला. नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश खांडगे यांची आमदार जयदेव गायकवाड,संपादक अरुण कोरे यांनी खांडगे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
खांडगे म्हणाले,” जुन्या नव्या कार्यकर्त्याच्या मेळ घालीत सक्षम पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार. लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचाराचा झंझावात सुरू आहे. या प्रवाहात तरूण पिढीला आणण्यासाठी संघटनात्मक कामावर भर दिला जाईल.

error: Content is protected !!