कार्ला:
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकविरा कृती समितीने आमरण उपोषणाचा नारा दिला आहे.
सोमवार दि.१४/०३/२०२२ पासुन हे बेमुदत आमरण उपोषण केले जाणार आहे.गेली कित्येक वर्षे समितीच्या वतीने विविध मागण्यांबाबत सातत्यानेशासन दरबारी मोर्चे,रस्ता रोको आंदोलने करुन निवेदणे देण्यात आली आहेत,मात्र अद्याप तोडगा न निघाल्याने उपोषणाचा पवित्रा घेतला असल्याचे एकविरा कृती समितीचे संस्थापक भाई भरत मोरे यांनी दिला आहे.
आहे.
शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकऱ्यांना उपोषणास बसावे लागत असून इंदायणी पात्र खोल करावे, इंद्रायणी पात्र खोल नसले मुळे ऑगस्ट महिन्यातील ८ दिवसाच्या पुरामुळे ३०
गावातील शेतीतील पिके नष्ट होतात. या पुरामुळे शेती पुरक व्यवसाय बागायती शेती करता येत नाही.
इंद्रायणी नदीत वलवण धरणाचे पाणी सोडावे कारण नदी उथळ असल्याने पुरानंतर पाणी थांबत नाही. म्हणुन शेतीपुरक व्यवसाय व बागायती शेती करता येत नाही. त्यामुळे शेतकरी समाज गरीबी,दारिद्रय,शिक्षण,
बेरोजगारी ने त्रस्त आहे.नदीतील
जलपर्णी,नदीपात्र व ओढ्या लगतची अतिक्रमणे काढावे अशा कृती समितीच्या मागण्या आहेत.

error: Content is protected !!