कामशेत:
कुसगाव-कामशेत रोड येथील नैसर्गिक नाला एका खाजगी व्यवसायिकाने केला बंद कामशेत कामशेत येथील इंद्रायणी कॉलनी मधील कुसगाव – कामशेत मुंबई पुणे हायवे रोड जमिन सर्वे नंबर १३२,१३४,१३५ मधील नैसर्गिक नाला एका खाजगी व्यवसायिकाने बंद केला त्यामुळे या वर्षी पावसाळ्यात कामशेत मधील इंद्रायणी कॉलनी व मुंबई पुणे महामार्ग ही पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 
 दरवर्षी या भागात पावसाळ्यात इंद्रायणी कॉलनी मध्ये पाणी साचत असते तेथे गुडघाभर पाणी जमा होते .त्यामुळे तेथील नागरिकांच्या घरात पाणी शिरते लोकांची मोठी तारांबळ  होत असते. त्यातून आता हा नाला बंद केल्यामुळे डोंगर रांगा मधून येणारे पाणी  इंद्रायणी कॉलनी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिरकाव होऊन हा परिसर पाण्याखाली जाईल त्याचा परिणाम येथील जनजीवनावर होईल अशी भीती निर्माण झाली आहे. तसेच तेथील नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. या बाबत खडकाळे (कामशेत) ग्रामचंचायत यांना लेखी निवेदन दिले आहे .परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप  झालेली नाही. 
ग्रामपंचायत व प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही तर नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित यावर मार्ग काढावा
यासंबंधी कामशेत ग्रामपंचायतचे सरपंच रुपेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले संबंधित व्यक्तीस ग्रामपंचायत ने लेखी नोटीस दिली आहे. तसेच आय आर बी कंपनीनै तशा स्वरूपाचे कारवाई करण्यासाठी लेखी पत्र दिले आहे पण यावर आय आर बी ने अद्याप कारवाई केलेली नाही तरी लवकरात लवकर संबंधितावर कारवाई करून व नैसर्गिक नाला पूर्ववत करण्यात यावा अशी येथील स्थानिकांची मागणी आहे.
व्यवसायिक सिराज खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले जे ब्रिज चे जे काम झाले आहे  ते काम अर्धवट सोडल्यामुळे सोडल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे व हे पाणी रस्त्याच्या बाजूने जाणार आहे त्याचा परिणाम येथील लोकांना होणार नाही शिवाय यासंबंधी आयआरबीला पत्र दिले असून व आयआरबीला सांगण्यात आले आहे की पाणी काढण्यासाठी वेगळी पाईपलाईन टाकण्यात यावी.

error: Content is protected !!