आमदार शेळके यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ
मावळात गावठाणांतील मिळकतींचे ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण
तळेगाव दाभाडे :
स्वामित्व योजनेची सुरुवात शनिवारी (दि. १२) ला मावळ तालुक्यातील वराळे गावातुन करण्यात आली.याचा शुभारंभ आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून मावळातील गावांच्या गावठाणांतील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे.
यावेळी आमदार सुनिल शेळके, उपअधीक्षक भूमी अभिलेख उर्मिला गलांडे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष, नगरसेवक गणेश खांडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, नगरसेवक सुनिल ढोरे, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायणराव ठाकर, युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, सुनिल दाभाडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, देहू नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, वराळे ग्रामपंचायत सरपंच मनीषा शिंदे, तसेच आजी-माजी सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वामित्व योजनेच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या वतीने प्रत्येक गावाच्या गावठाणातील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून गावठाण क्षेत्र हद्द निश्चिती, नकाशे, मिळकत पत्रिका तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक जागेचा/ मिळकतीचा नकाशा तयार होईल. सीमा निश्चित होतील व मिळकतींचे नेमके क्षेत्र माहित होईल. गावठाणातील प्रत्येक मिळकतीच्या मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) तयार होणार आहे.तसेच गावठाणातील रस्ते, समाजमंदिरे, नाले इत्यादींच्या सीमा देखील निश्चित होणार आहेत. त्यामुळे विकासकामे करण्यास सुलभता येईल. या योजनेबाबत ग्रामस्थांना असणाऱ्या शंकांचे निरसन संबंधित विभागाचे अधिकारी करणार आहेत.
भविष्याचा विचार करून स्वामित्व योजनेच्या दूरदर्शी उपक्रमास सर्व ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे,असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे.

error: Content is protected !!