पुणे:
पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती मावळ आयोजित मावळ महोत्सव २०२२ कृषी व पशुपक्षी जनावरांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहे.
दि.१५ मार्च ते 1१७ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे. कामशेत,जुना मुंबई पुणे हायवे ता,मावळ येथे होणाऱ्या प्रदर्शनात पशुपालकास रोख रक्कमचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबूराव वायकर यांनी दिली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,आमदार सुनिल शेळके,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सभापती प्रमोद काकडे, पूजा पारगे,सारीका पानसरे,भारत शेंडगे,अनिल देशमुख,शिवाजी विधाटे,सुधीर भागवत उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!