नाणोलीत जागतिक महिला दिनानिमित्त किसान गोष्टी
नाणोली तर्फे चाकण:
कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी मावळ तर्फे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) सन २०२१-२२ अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त किसान गोष्टी कार्यक्रम तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पड़वळ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
नाणोली तर्फे चाकण येथे घेण्यात आला.त्यावेळी श्री.नवीनचंद्र बो-हाडे कृषि पर्यवेक्षक वडगाव यांनी महिला सशक्तिकरण, झिरो शुन्य मशागत यावर मार्गदर्शन केले.त्यानंतर कर्तुत्ववान महिलांचा सन्मान ‌करण्यात आला.मंडळ कृषि अधिकारी आर.पी. गायकवाड,राहुल घोगरे बी टी एम आत्मा, पिक विमा प्रतिनिधि सागर ढवळे , ग्रामसेवक
सचिन लिंबरकर , सरपंच मोनिका शिदें .उपसरपंच अनिता बोराड़े, अनिता गायकवाड,सुमन लोंढे,शारदा मराठे,मनिषा बो-हाडे,आरती टपाले , रेश्मा शिंदे,पल्लवी मालपोटे व शेतकरी महिला उपस्थित होते.सूत्रसंचालन पी.एस.पाटील यांनीं केली.
कृषि सहाय्यक प्रियंका पाटील म्हणाल्या,”
महिला सक्षमीकरण व महिला आर्थिक सबलीकरण होणे गरजेचे आहे त्यासाठी महिलांना कृषि विभागाच्या विविध योजनाच्या माध्यमातून ‌प्रोत्साहन देण्यात येत आहे.

error: Content is protected !!