निगडे:
येथील प्रतिक विद्यानिकेतन हायस्कूल मध्ये येथे दहावीच्या मुलांना निरोप समारंभ देण्यात आला .त्यावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांनी मुलांना शुभेच्छा दिल्या .आदर्श सरपंच सविता बबूशा ‌‌ भांगरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सरपंच भांगरे म्हणाल्या,”आपल्या शाळेचे , गावाचे नाव उंचावले पाहिजे.यासाठी १००% रीझल्ट लागला पाहिजे तसे चांगले गुणही मिळाले पाहिजे.
संस्थेचे सहसचिव वसंतराव पवार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आजची पिढी ही उद्याचे भविष्य आहे .तरी सर्वांनी आपले भविष्य उज्ज्वल करावे. उपस्थित सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
दहावीचे वर्ग शिक्षक शशीकांत कोळेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद करत मुलांचा पाया भक्कम केला की शाळेचा १०० टक्के रिझल्ट लागेल असा विश्वास दिला.मुख्याध्यापक उत्तम मांडे उपशिक्षक चंद्रकांत मुरूमकर वर्ग शिक्षक शशीकांत कोळेकर, राजकुमार ढाकणे उपस्थित होते.

error: Content is protected !!