नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी करंडक २०२२
वडगाव मावळ:
टमावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी करंडक २०२२ या स्पर्धेचा उदघाटन शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पुणे जिल्ह्यात प्रथम आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या डी.वाय .पाटील स्टेडियमवर राष्ट्रवादी करंडक २०२२ या भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रा. काँ.महाराष्ट्र ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे , रा. काँ. तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव आप्पा वायकर, मा. ता. ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाषराव जाधव, काँग्रेसचे मा तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, रा. काँ. महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, सभापती गणेश ढोरे, जेष्ठ नेते मंगेश ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा शारदा ढोरे, मा. उपसरपंच श्री. तुकाराम ढोरे, वडगाव शहर रा.काँ.अध्यक्ष राजेंद्र कुडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल मालपोटे, चेअरमन वि.का.सोसायटी चंदुकाका ढोरे, सरचिटणीस रा.काँ. गंगाराम ढोरे, नगरसेवक राहुल ढोरे, नगरसेवक सुनिल ढोरे, नगरसेविका पुनम जाधव, नगरसेवक, चंद्रजीत वाघमारे, मा चेअरमन कृ.उ. बाजार समिती पंढरीनाथ ढोरे, कार्याध्यक्ष पु.जि. रा. काँ ओबीसी सेल अतुल राऊत, रा. काँ. युवक शहराध्यक्ष भाऊसाहेब ढोरे, मा. ता. ओबीसी सेल अध्यक्ष मंगेश खैरे, कार्याध्यक्ष सुरेश जांभुळकर, रा. काँ. जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष प्रकाशराव कुडे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन ढोरे, मा ता अल्पसंख्याक सेल अध्यक्ष आफताब सय्यद, वडगाव महिला शहराध्यक्षा मिनाक्षी ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान उपाध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका माया चव्हाण, नगरसेविका प्रमिला बाफना, मा.ता. क्रिडा सेल अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, उद्योजक राजेश बाफना, जेष्ठ खेळाडू संतोष खैरे, सुनिल शिंदे, प्रवीण ढोरे, विशाल वहिले, शरद ढोरे, सोमनाथ धोंगडे, वडगाव शहर ओबीसी सेल अध्यक्ष मयूर गुरव, वडगाव शहर रा.काँ.विद्यार्थी सेल अध्यक्ष कु.पवन ढोरे, पदवीधर म.सं. वडगाव शहराध्यक्ष सौरभ सावले, सा.न्या. विभाग रा.काँ. वडगाव शहराध्यक्ष गणेश पाटोळे, रा.काँ. सोशल मीडिया शहराध्यक्ष कु.राहील तांबोळी, वकील बार असोसिएशन अध्यक्ष सोमनाथ पवळे, नामदेव गुंजाळ तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी व वडगाव शहरातील आजी-माजी पदाधिकारी, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणताही खेळ हा व्यक्तीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या घटकांपैकी एक असतो, निरोगी आयुष्य जगायचे असेल तर खेळाला तुमच्या व्यस्त जीवनात स्थान दिले गेले पाहिजे. यासाठी प्रोत्साहन हा खूप महत्वाचा भाग असतो याच भावनेने वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तसेच शहरातील जेष्ठ व युवा खेळाडू यांच्या मार्गदर्शनातून यशस्वी नियोजनाने व नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे मित्र परिवाराच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
क्रिकेट हा खेळ सर्वच राजकीय पक्षाच्या सदस्यांना एकत्रितपणे मुक्त संवाद व दर्जेदार खेळ दाखवण्यासाठी तसेच नवनवीन युवा खेळाडू निर्माण करण्याचे एक व्यासपीठच आहे असे म्हणटले तरी काही वावगे ठरणार नाही..
यातूनच नवनवीन खेळाडू हे आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करत असताना स्वताच्या उद्योग व्यवसायाला जोड देऊन कार्यकर्ता होत असतात आणि यातूनच पक्ष संघटना बळकट होत असते.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी करंडक २०२२ या स्पर्धेत नगसेविका प्रमिलाताई बाफना स्पोटर्स क्लबने प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रवादी करंडकावर आपले नाव कोरले.
अंतिम सामन्यावेळी राष्ट्रगीत घेऊन शेवटी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रवादी करंडक २०२२-या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संंघमालक व सर्वच खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेदरम्यान क्रिडा, कला तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!