निगडे:
येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला .गावातील सर्व महिला उपस्थित होत्या. ग्रामपंचायत सदस्य पूजा भागवत ,मीरा भांगरे शिक्षिका मंजुषा शिवदे,निलम मखर,अरूणा भगत निशा मुंडे जयश्री चांदबोधले सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा वर्कर सीआरपी‌ उपस्थित होते.सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला .
सर्वांनी महिलांना शुभेच्छा दिल्या मंजुषा शिवदे यांनी महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयी माहिती दिली. सरपंच सविता बाबुशा‌‌ भांगरे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या . सरपंच सविता भांगरे म्हणाल्या,”
जशा महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. तसेच पुरुषांनी देखील महिलांच्या बरोबरीने काम केले पाहिजे. महिला दिनाचा सन्मान सोहळा एका दिवसा पुरता मर्यादित न राहता महिलांचा सन्मान बाराही महिने सन्मान करावे.उपस्थित सर्व महिलांना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आली.

error: Content is protected !!