नवलाखउंब्रे:
गाव पातळीवर विकासाची गंगोत्री आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. गावच्या समृद्धीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला.
नवलाखउंब्रेतील विविध विकास कामांच्या भूमीपूजन प्रसंगी आमदार शेळके बोलत होते. कृषी पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर ,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे , माजी सभापती निवृत्ती शेटे,माजी उपसभापती शांताराम कदम,जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, पंचायत समिती सदस्या ललिता कोतुळकर,सरपंच चैताली कोयते,संतोष नरवडे,नवनाथ पडवळ,रविंद्र कडलक,अशोक जगनाडे,मयूर नरवडे,संग्राम कदम,गोरख शेटे,राजू पडवळ,नागेश शिर्के,पंडीत दहातोंडे,प्रतिक कडलक,अशोक जगनाडे,लक्ष्मण नरवडे यांच्यासह अन्य गावकरी उपस्थित होते.
सुमारे दहा कोटी तेहतीस लाख रुपयाच्या विविध विकास कामांची भूमीपूजन आणि उद्घाटने झाली. गावातील पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिनी योजना,साकव पूल,बाजारपेठेतील रस्ता,अंतर्गत रस्ते,बंदिस्त गटारे,पशुवैद्यकीय दवाखाना,नवलाखउंब्रे,बधलवाडी,जाधववाडी,मिंडेवाडीसह ठाकरवाडीतील कामांचा यात समावेश आहे. तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत राम मंदिर परिसर सुधारणा कामांचा यात समावेश आहे.
सरपंच चैताली कोयते म्हणाल्या,” आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे मार्गी लागली याचे समाधान आहे. चैताली कोयते यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी सेवादलाचे तालुकाध्यक्ष जालिंदर शेटे यांनी सुत्रसंचालन केले रविंद्र कडलक यांनी आभार मानले.

error: Content is protected !!