
संत विचारांची कास धरणारी ‘मावळची मुक्ताई’ जयश्रीताई
मावळमित्र न्यूज विशेष:
राम कृष्ण हरी..वारकरी संप्रदायाचा पवित्र मंत्र..गळ्यातील तुळशीची माळ अन कपाळीचा चंदन ही या वैष्णवाची आभूषणे..हा वैष्णव टाळ,विणा,मृदुंगाचा गजरात तल्लीन होतो..भगवी पतका खांद्यावर घेऊन निघालेला वारकरी..आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान.वारकरी संप्रदायाची ही पतका खांद्यावर घेऊन मिरवणा-या पाचाणे येथील जयश्रीताई अक्षय येवले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रवचनकार व किर्तनकार.मावळ तालुक्यातील पहिल्या महिला किर्तनकार.ज्यांना’ मावळची मुक्ताई’ ही बिरुदावली शोभून दिसते.
औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौकात जयश्रीताईचे बालपण गेले. पदवी पर्यत शिक्षण घेतलेल्या जयश्रीताईवर संस्कारचे धडे वडील विजय गायकवाड आणि छाया विजय गायकवाड यांनी दिले. संत विचारांचा पगडा असणा-या गायकवाड कुटुंबियांनी अध्यात्मिकाची कास धरली. आणि दिवसागणिक संत विचारांचा पगडा जोपसला आणि वाढवला. जयश्रीताई यांचे वडील विजय महाराज गायकवाड यांनी शेगाव येथील गजानन महाराज संस्थानात चार वर्ष वारकरी शिक्षण घेतले .आणि वडील किर्तनकार होऊन संत विचाराचा प्रचार आणि प्रसार करू लागले.
संपूर्ण गायकवाड कुटुंबिय वारकरी असल्याने संत विचारांची कास या मंडळींनी धरली.माहेरी असलेली हरिपाठ,प्रवचन,किर्तन,भजनाची गोडी जयश्रीताईनी जपली. त्याही संत साहित्याच्या अभ्यासात परांगत होत होत्या. माहेरी अध्यात्मिक गोडी आहे,तसेच सासर ही वारकरी संप्रदायाचे असावे अशी अपेक्षा ठेवलेल्या गायकवाड कुटूंबानी पाचाणे तील येवले कुटुंबियांशी सोयरीक केली.जयश्रीताई अक्षय महाराज येवले या नावाने समाजात वावरू लागल्या. सासरीही सर्वजण वारकरी संप्रदायाचे अनुयायी. श्री.अक्षय महाराज येवले त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र कोषाध्यक्ष या पदाची जबाबदारी. अखिल वारकरी संघाने ही जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे.
ते वारकऱ्यांसाठी कार्य करतात. त्यांचीही पत्नीला उत्तम साथ आणि सर्वोत्तम मार्गदर्शन त्यांच्यामुळेच माझ्या जीवनाला आकार भेटला असल्याचे सांगताना जयश्रीताई यांचा स्वाभिमान भरून येतो.जयश्रीताईचे सासरे ज्ञानेश्वर येवले,सासूबाई वैजयंती ज्ञानेश्वर येवले उत्तम साथ मिळत आहे. जयश्रीताईनी वयाच्या दहाव्या वर्षा पासून कीर्तन करण्यास सुरुवात. कीर्तनाचे हे शिक्षण वडिलांकडूनच घेतले. लग्न झाल्यानंतर सासरचे कुटुंब पण सांप्रदायिक असल्यामुळे त्यांची साथ व मार्गदर्शन लाभले.ताईनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात कीर्तन सेवा केली आहे.नुसती महाराष्ट्रातच त्या किर्तन करीत नाहीत,तर महाराष्ट्रा बाहेर गुजरात व कर्नाटक याहे राज्यामध्ये कीर्तनसेवा झालेली आहे.
नवयुग सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्षा असलेल्या जयश्रीताई अनेक शाळेमध्ये जाऊन संत चिचाराचे प्रबोधन करीत आहे. गावागावातील महिला एकत्रित करून बचत गटांचे निर्माण करून त्यामधून
रोजगार निर्मिती साठीचे त्यांनी पाऊल टाकले आहे. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, दहा गरीब मुले दत्तक घेऊन त्यांचा शालेय खर्च अशा अनेक उपक्रमातून त्या सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्ञानेश्वरी आणि गाथेचे जगभर निरूपण करण्याचा जयश्रीताईचा मानस असून सातासमुद्रापार विठ्ठल नामाचा गजर करण्याचा त्यांचा ध्यास आहे. या त्याच्या ध्येयला बळकटी मिळो हीच श्री.विठ्ठल रखुमाई चरणी प्रार्थना.
मावळकन्या असलेल्या जयश्रीताई अक्षयमहराज येवले यांना वारकरी सांप्रदायातील योगदानाबद्दल काव्यामित्र संस्थेचा नवज्योती महाराष्ट्राच्या,राजमाता महिलामंच च्या तर्फे “विशेष उत्कृष्ट महिला,स्वामी विवेकानंद विचारमंच तर्फे समाज गौरव, गार्गी फाउंडेशन तर्फे आदर्श महिला , शिव प्रतिष्ठानचा जीवनगौरव, जनसेवा प्रतिष्ठान तर्फे कार्य कर्तुत्व गौरव व काव्यामित्र संस्थेचा “आदर्श महिला समाजरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आज जागतिक महिला दिन विविध क्षेत्रात प्राविण्य मिळालेल्या माता भगिनींचा गौरव करण्याचा आजचा दिवस.संत विचारातून प्रबोधन करणा-या जयश्रीताई याच्या पिढीच्या आदर्श आहे. त्यांच्या कार्याला भरभरुन शुभेच्छा.
.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे







