कर्तृत्व सिद्ध करायच्या वाटेने जाणारी ज्योती
मावळमित्र न्यूज विशेष :
सावित्रीच्या लेकींनी प्रत्येक क्षेत्रात आपली हुकमत सिध्द केली आहे.यशाच्या प्रत्येक टप्यावर आपली भूमिका योग्य पध्दतीने साकारण्याचे स्वप्न पहिले आणि
ज्ञानदान या पवित्र क्षेत्रात आपले पाऊल टाकून शिक्षिका होण्याच स्वप्न पहिले.आपलया स्वतःच्या अटीवर यशाची व्याख्या तयार केली .आणि स्वताच्या नियमांवरच ते
मिळवले. या मिळवलेल्या आयुष्याबद्दल अभिमान बाळगला.तुमचे सामर्थ्यच तुम्हाला’ इतरांपेक्षा वेगळे बनवत असते. ही संकल्पना लक्षात घेऊन
तिने सामाजिक कार्याल स्वताला झोकुन दिले आणि या वाटेने आपली वाटचाल सुरु केली .
यशस्वी व्हायचं असतं तर तयार व्हा आणि कामाला लागा हे ब्रीद वाक्या मनाशी बांधून या वाटेने पुढे जाऊन कर्तृव्य सिध्द करायचे आहे .वाटेत कितीही अंधार असला तरी तेवणा-या ज्योतीने अंधार नाहीसा होऊन उज्वल यशाचा प्रकाश पडतो हे साधे गणित तिला उमणले आहे .
म्हणूनच “कृतीविना दृष्टीकोन हे केवळ स्वप्न आहे .आणि दृष्टीविणा विना कृती करणे म्हणजे विळेचा अपव्यय आहे .त्यामुळे कृतीला दृष्टीकोनाची जोड देऊन आपली नविन वाटचाल तिने सुरू केली आहे.
आई आणि लेकीच्या नाते हे खूप ऋणानुबंधाचे असते.या नात्यातील वीण सुख दु:खाच्या धाग्याने कायमच गुंफलेली असते. असेच मायलेकीचे नाते पाटणच्या जमुना गणेश पेटकर आणि ज्योती यांचे. आई जमुना बाई पटेकर पाटण ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या. लेक ज्योतीला शिकून शिक्षिका होण्याचे स्वप्न होते. प्राथमिक शिक्षण मळवली झाल्यावर उच्च शिक्षण लोणावळ्यातील व्हीपीएस शाळेत झालेल्या ज्योती या बी.ए.डी.एड पर्यत शिकलेल्या. ज्योती यांचे लग्न होऊन त्या ज्योती दिलीप आंबेकर झाल्या.आंबेकर कुटुंबियांची लाडकी सून असलेल्या ज्योती यांची वकृत्वावर कमांड होती. शाळा महाविद्यालय झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी कायमच यश मिळवले.
वेगवेगळया पातळीवर झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांचा लक्षणीय सहभाग असायचा. अगदी शाळा महाविद्यालय तून सुरू झालेले यश अगदी जिल्हा पातळीवर पोहचले.ज्योती ताई जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवू लागल्या. माहेरी राजकीय वारसा होताच. आई जमुना गणेश पटेकर सरपंच व मोठे दीर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अंकुश आंबेकर यांच्या सहवासातून ज्योती ताई यांची राजकारण आणि समाजकारणाची बैठक पक्की झाली. सामाजिक कार्याचे हे बाळकडू संभाळून सासरी असलेला पारंपरिक उद्योग व्यवसाय संभाळून त्या सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होऊ लागल्या.
ग्रामपंचायत सदस्य पदी वर्णी लागून त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. राजकारणाची पहिली पायरी ओलांडून त्या निघाल्या. पहिलेच पाऊल यशस्वी पडल्यावर ग्रामविकासाचा ध्यास उराशी बाळगून त्या कामाला लागल्या. टाकवे ग्रामपंचायत आंदर मावळातील सर्वात मोठी ग्रामपंचायत. वेगवेगळ्या पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या ग्रामपंचायतीत नवी पिढी धुमधडाक्यात काम करीत आहे यात ज्योती दिलीप आंबेकर यांचाही सहभाग वाखण्या सारखा आहे. ज्या मतदार राजांनी निवडुन दिले त्या मतदाराच्या सोयी सुविधेसाठी विविध कल्पकता डोक्यात ठेवून त्या काम करीत आहे.
विकास कामांची घौडदौड सुरू झाली. वार्ड मध्ये भेडसावत असलेली पाणी समस्या पहिल्याच महिन्यात सोडवली. पुढे गावातील महिला सक्षम करण्यासाठी ८० महिलांना ब्युटी पार्लर, शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्यासाठी आग्रहाने पुढाकार घेतला. गावातील महिलांना मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले.
कोरोना लसीकरणा करीता जनजागृती केली .काम रेशनकार्ड काढून देण्याचे असो,की उत्पन्नाचा दाखला काढून देण्याचा.
कोणाचे आधार कार्ड काढायचे असो की त्यातील दुरुस्ती. मतदान यादीत नावे समाविष्ट करायचे असो या कामात ज्योतीताई पुढेच. हे समीकरण जवळपास निश्चितच झाले आहे. गावातील विकास कामात सहभाग घेताना प्राथमिक आरोग्य केद्रातील निवारा शेड साठी महिंद्रा कंपनीकडून सीएसआर फंड आणला .हे काम मार्गी लागले असून नागरिकांना त्याचा लाभ होत आहे.
वार्ड मधील सांडपाणीचा प्रश्न असो की,गावातील दिशा दर्शक फलक लावण्या बाबत सूचना ही कामे मार्गी लावली असून इतर कामांसाठीचा पाठपुरावा अशाच सुरू राहील हे निश्चित.
पुरूषांच्या खांद्याला खांद्या लावून महिलाही आता,प्रत्येक क्षेत्रात करिअर करताना दिसते आहे. या साठी तिच्या अंगी असणा-या गुणांचा ती विकास करीत आपले करिअर निश्चित करून यशस्वी होण्यासाठी धडपड करीत असते. तिच्या या धडपडणारा पंखाला कायमच कुटूंबातील मंडळी बळ देत असतात. हेच बळ तिच्या उंच शिखरावर यशाचे गमक आहे. असेच पंखाचे बळ दिलीप आंबेकर ज्योतीताईला देऊन तिच्या करिअरची वाट सहज,सुलभ होईल यासाठी प्रयत्न करतोय. यशस्वी पुरूषाच्या मागे स्त्री असते हे जितके खरे तितकेच यशस्वी रणरागिणीच्या मागे पतीराज असतो हे खरे.

error: Content is protected !!