प्रत्येक डबेवाले कामगाराचे स्वप्न साकार , मुंबईत साकारले ” डबेवाले भवन “
मुंबई:
गेली १३३ वर्षे मुंबई करांच्या सेवेत वेळेवर जेवणाचे डबे पोहोच करणारे डबेवाले जगभरात आपल्या आगळ्या वेगळ्या नियोजन कौशल्याने प्रशंसेचे धनी ठरलेल्या आणि जागतीक पातळीवरील अनेक मानांकने प्राप्त करून आपल्या कार्याचा ठसा सर्व दुर पोहोचविणाऱ्या कामगारांचे कष्ट सार्थकी लागल्याचे समाधान आणि आपल्या हक्काची वास्तू मिळाल्याचा आनंद प्रत्येक डबेवाले कामगाराच्या चेहर्यावर जाणवत होता .
ही वास्तू उभारणीची संकल्पना खरेतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री उद्धवजींची होती .पर्यावरणमंत्री तथा युवासेनाप्रमुख मा . श्री अदित्यजी ठाकरे आणि मुंबईच्या महापौर सौ . किशोरीताई पेडणेकर यांच्या पुढाकारातून पालीका आयुक्त श्री इकबाल सिंह चहल आणि पालीका अतिरीक्त आयुक्त श्री सुरेश काकानी यांच्या प्रयत्नातून मा. अध्यक्ष श्री सोपानकाका मरे , यमनाजी घुले यांचे मार्गदर्शनाने विद्यमान मंडळ अध्यक्ष श्री रामदास करवंदे ट्रस्ट अध्यक्ष उल्हासभाऊ मुके , ट्रस्ट सचिव श्री विनोद शेटे , मंडळ सचिव श्री किरण गवांदे यांचेसह विद्यमान कार्यकारणीतील सर्वच पदाधिकारी वर्गाने जे अविरत परीश्रम घेतले .
भवन उभारणी कामी सतत पाठपुरावा करत सदर मागणीचा गेले १० वर्षे ज्यांनी ध्यास घेतला ते डबेवाल्यांच्या मुख्य प्रवक्ते श्री विष्णू काळडोके या सर्वांच्या परीश्रमाचे फलीत म्हणून ही भव्यदिव्य वास्तू आज ” डबेवाला भवन ” नावाने दिमाखात उभी राहू शकली .
जगभरातून व्यवस्थापन क्षेत्रातील कंपन्या आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता डबेवाल्यांच्या अचूक वेळेच्या नियोजनाचे धडे देण्यासाठी ही वास्तू मैलाचा दगड ठरेल . डबेवाल्यांच्या मुलांना आणि महिलांना नवनवीन कौशल्य प्रशिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण देत रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध करून डबेवाले कामगाराचे आर्थिक उत्पन्नात वाढ करून त्यांच्या जिवणमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ” डबेवाले भवन ” ही वास्तू प्रेरणास्राेत राहील .
आज उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लाभली ती महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री , पालकमंत्री मुंबई उपनगर मा . श्री अदित्यजी ठाकरे , परिवहनमंत्री मा. श्री अनिल परब आणि मुंबई च्या महापौर सौ . किशोरीताई पेडणेकर यांचे डबेवाले बांधवांकडून आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!