मावळमित्र न्यूज विशेष:
समज उमज यायच्या आतच वडीलांचे छत्र हरपलं.. आई,बहीणी आणि मामांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत वाढवलं आणि मोठं केले. या सगळ्यांच्या मायेने
जबाबदारी फार लवकर समजली. आणि याच जबाबदारीतून आईचे पांग फेडायला आणि बहिणीना वडीलांच्या प्रमाणे भरभक्कम आधार द्यायला हा तरूण कुठेच मागे नाही. हे सगळे करताना कुटुंबाची जबाबदारी तितक्याच अलगदपणे पेलत आहे.
लेकरांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि पत्नीच्या गालावर पडणारी खळी,कितीही श्रम केले तर ते कष्ट क्षणात दूर घालवण्याचे मोठे टाॅनिक आहे. कुटूंब हाच आपला आधार आहे. या आधाराला अधिक मजबूत करताना कितीही कष्टाची धमक असलेला सागर गणपत जाधव हा ऐन तीसतील तरूण.
माळवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक आणि इंदोरी च्या प्रगती विद्यामंदिरात माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या तरूणाचे महाविद्यालयीन शिक्षण तळेगाव स्टेशन च्या इंद्रायणी महाविद्यालयात झाले. शिकत असतानाच दु:खाची दरी पाहिली. तीही अकराव्या वर्षी. वडिलांचे छत्र हरपले. चार बहिणी आणि आई अरूणा गणपत जाधव यांनी लाडक्या सागर ला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. त्याला वाढवले.संस्काराच्या सोबत कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव करून दिली.
हे सर्व करताना बहिण आणि भाच्याच्या मागे
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे मामा, यांचे कायमच पाठबळ राहिले .मामाने दिलेल्या पाठबळाचा आदर्श घेऊन आपणही सर्वाच्या मदतीला धावून आले पाहिजे अशी धारणा केलेल्या सागराने कष्टाला आपले मानले.
सागरच्या पाठीशी भोंगाडे मामा खंबीर पणे उभे राहिले तसे दाजी संजय नरवडे, गणेश घोजगे,श्रीनिवास राक्षे,प्रकाश वाळुंज हेही राहिले. आता नात्यागोत्याचा विस्तार झाला.नाव लौकिक वाढू लागला. हाताला लक्ष्मीचे वरदान मिळू लागले
आज हे सगळ दिसत असले तरी या साठी राखलेला संयम,केलेले कष्ट, जपलेली मने, मन मारून जगलेले ते दिवस आज ही डोळ्यासमोरून तरळू जातात.नवनीत शिकताना सागर दूध डेअरीवर रतीब टाकायचा. तेव्हा पासून सुरू केलेले कष्ट आजही तसेच आहे. नववीत शिकताना दूधाचा रतीब टाकला,त्या नंतर हाताला मिळेल ते काम करीत सागर मोठा झाला. हाताला जे मिळेल ते काम केले. यातून अनुभव वाढला. याच अनुभवातून बांधकाम व्यवसायात सुरू केले लॅन्ड डेव्हलपर्स मध्ये करिअर करताना इतरांच्या हाताला काम देता आले. ओमसाई असोसिएटस,ओमसाई लॅन्ड डेव्हलपर्स, सावली हाॅटेल अशा वेगवेगळे व्यवसाय संभाळित सागर जाधव सागरशेठ जाधव कधी होऊन गेला हे त्याला समजले नाही.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपल्या कर्तृत्वावर मोठा झालेल्या सागरला आप्तस्वकीयांनी आधार दिला पाठबळ दिले. आणि लढण्याची ताकद दिली. हीच ताकद त्याच्या यशाचे गमक आहे. सागरने यशस्वी उद्योजक यश संपादन केले याची सार्थ अभिमान मुले शौर्य,विराज आणि पत्नी आशा हिला आहे. आजचा हा लेखन प्रपंच सागर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त करताना गतकाळ आठवून गेला. आजच्या या वाढदिवशी सागरला आभाळभर शुभेच्छा…

error: Content is protected !!