कामशेत:
कामशेत येथील छत्रपती शिवाजीमहाराज क्रीडांगणावर
महाराष्ट्रातील सर्वात मोठा नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या,महोत्सवात मावळ तालुक्यातील १० हजार युवक-युवतींना रोजगार देण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे. तालुक्यातील युवक युवतींनी या नोकरी महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन या महोत्सवाचे निमंत्रक,पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन मराठे यांनी केले.
भारतातील नामांकित कंपन्यांच्या सहभागाने हा नोकरी महोत्सव संपन्न होणार आहे.जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, नितीन मराठे फ्रेंड्स सर्कल, भूमिपुत्र युवा फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून हे आयोजन करण्यात आले आहे.
गरजू युवक- युवतींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नितीन मराठे यांनी केले आहे.कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. बेरोजगारीमुळे अनेकांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा प्रसंगी मावळ तालुक्यातील युवक युवतींच्या पाठीशी उभे राहून त्यांना रोजगार मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे. मावळ तालुक्यातील होतकरू तरुण तरुणी उदर निर्वाहासाठी नोकरीच्या शोधात पुणे मुंबईला जात असतात. आता मावळ मध्येच त्यांना रोजगार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे नितीन मराठे म्हणाले.
भारतातील सुमारे १५० नामांकित कंपन्यांनी या नोकरी महोत्सवात सहभाग नोंदविला आहे.पाचवीपासून, दहावी, बारावी, पदवी ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या पास-नापास सर्वांना नोकरीची संधी येथे मिळेल. आयटी इंजिनियरिंग, शेती, मिडिया, बीपीओ, हेल्थकेअर, रिअल इस्टेट अशा असंख्य नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी आणि त्वरित जॉईनिंग लेटर मिळेल, अशी माहिती नितीन मराठे यांनी दिली.
पाचवी पास/नापास व त्यापुढील, सर्व पदवीधर, पदव्युत्तर, डिप्लोमा, नर्सिंग, इंजिनिअरिंग, एमबीए, कृषी पदवीधर, आयटीआय, १० वर्षे कामाचा अनुभव, अंतिम वर्ष परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनाही संधी
सर्व युवकांना नितीन मराठे यांच्याकडून मोफत जॉबकार्ड देण्यात येईल. पात्र उमेदवारांना मिळणार त्वरित जॉईनिंग लेटर, कायमस्वरूपी नोकरी, सर्व मुलाखती नियोजित ठिकाणीच घेतल्या जातील.
बायोडेटा / रेझ्युमे (कमीत कमी 3 प्रती), दोन पासपोर्ट साईज फोटो, आवश्यक मूळ कागदपत्रे छायाप्रतींसह
शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, पुणे-मुंबई महामार्गालगत, पेट्रोल पंपासमोर, कामशेत, ता.मावळ
रविवार दि. ६ मार्च, सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा महोत्सव चालू राहणार आहे.

error: Content is protected !!