मुंबई:
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे डबेवाला भवन करीता मंजूर करण्यात आलेल्या जागेचे वाटप पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते मुंबई डबेवाला संघटनेला देण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शेरल्री बांद्रा व्हिलेज, बांद्रा पश्चिम येथील समाज कल्याण केंद्राची जागा मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनला देण्यात आली असून या जागेचे वाटप पत्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे यांना सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सह आयुक्त (सुधार) रमेश पवार, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) केशव उबाळे तसेच डबेवाला असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उप स्थित होते.
शिरली बांद्रा व्हिलेज बांद्रा येथील नगर भूखंड क्रमांक १३१७ ते १३१९, १३३० ते आणि १३३१ येथील २८६. २७ चौरस मीटर क्षेत्रफळाची समाज कल्याण केंद्राची जागा डबेवाला भवनासाठी देण्यात आली आहे.
याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले”, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या वचनांची वचनपूर्ती आज केली असून यापुढील काळातही येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

error: Content is protected !!