मुंबई:
मुंबईचे डबेवाले हे मुंबईच्या पर्यटन नकाशावर आहेत. त्या मुळे जे विदेशी पर्यटक मुंबईला भेट देतात त्यातील बहुतांश पर्यटक हे मुंबईच्या डबेवाल्यांना भेट देतात. अशा वेळी जागे अभावी या पर्यटकांना डबेवाले फुटपाथवरच भेटतात.
तात्कालिन शिवसेना पक्ष प्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी डबेवाल्यांना आश्वासन दिले होते की मुंबईत उत्तमरीत्या” डबेवाला भवन ” बांधण्यात येईल. त्या अनुषंगाने मुंबई महानगर पालिकेने डबेवाला भवनसाठी बांद्रा येथे जागा उपलब्द करून दिली आहे. डबेवाला भवन बांधकाम शुभारंभ लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते होणार आहे. या कमी महत्वाची भुमीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी निभावली आहे .
त्यांचे अथक प्रयत्नाने डबेवाला भवनसाठी जागा उपलब्द झाली आहे. आता मुंबईत डबेवाला भवन उभे रहाण्याचा मार्ग मोकळा झाला. तीन वर्षा पुर्वी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने डबेवाला भवन साठी एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती.
डबेवाला भवन असे असावे,डबेवाल्यांचे मॅनेजमेंट जाणून घेण्यासाठी दररोज देशी विदेशी मॅनेजमेंटचे विद्यार्थी येत असतात. त्यांच्या साठी आद्यवत प्रशस्त जागा असावी.डबेवाला भवन मधून देशी विदेशी युनीव्हरसिटीत थेट लेक्चर देता येईल अशी व्यवस्था असावी.
डबेवाल्यांच्या पाल्यांना शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा,सांस्कृतीक उपक्रम राबवण्यासाठी प्रशस्त जागा असावी.डबेवाल्यांच्या महीलांना स्वयं रोजगारासाठी शिक्षण अथवा प्रशिक्षण देण्यासाठी प्रशस्त जागा असावी. आद्यवत वाचनालय असावे, एक सर्व समावेशक मोठे सभागृह असावे. १३० वर्षाचा डबेवाल्यांचा प्रवास व या कालखंडाचे सचित्र दालन डबेवाला भवन मध्ये असावे. हे दालन म्हणजे डबेवाल्यांचा ईतीहास असेल … हा डबेवाल्यांचा ईतीहास पहाण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येण्याची दाट शक्यता आहे. त्या मुळे हे दालन बनवताना संबधीत तज्ञांचा सल्ला घेण्यांत यावा.
शिवसेनेने डबेवाला भवनचे दिलेले आश्वसन पुर्ण केल्या बद्दल” मुंबई डबेवाला असोशिएशन” मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे आणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे आभारी आहोत. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी डबेवालांच्या घरांनसाठीच्या प्रश्नास लक्ष घालावे व त्याही आश्वसनाची पुर्तता करावी, डबेवाल्यांना माफक दरात परवडणार्या दरात मुंबईत घरे मिळवून द्यावीत. अशी डबेवाल्यांची इच्छा असल्याचे सुभाष तळेकर अध्यक्ष मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी सांगितले.

error: Content is protected !!