निगडे:
हस्त कलेतून फुलवलेल्या वस्तूने घर सजते. सजलेल्या घराचे सुशोभिकरण होते. त्यामुळे घरात प्रसन्न ही वाटते.ही प्रसन्नता सकारात्मक उर्जेचे बळ देते.परिणामी घराचे घरपण वाढते.हे घरपण अधिक वाढवण्यासाठी महिलांनी वेगवेगळ्या कला अवगत कराव्यात असे आवाहन निगडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता भांगरे यांनी केले.
निगडे येथे आरी वर्क जर दोषी प्रशिक्षणाच्या प्रशस्तीपत्रक वाटप सोहळ्यात भांगरे बोलत होत्या.निगडे ग्रामपंचायतीच्या महिला बालकल्याण विकासासाठी दहा टक्के विकास निधीतून हे प्रशिक्षण घेण्यात आले. पंचवीस महिलांनी सहभाग घेतला होता. सध्या महिला वर्गात साडी, ब्लाऊजवर आरी वर्कला अधिक मागणी आहे. या मागणीला केंद्रबिंदू मानून हे प्रशिक्षण घेण्यात आले.ज्याचा लाभ महिलांना होईल असा विश्वास सरपंच भांगरे यांनी केला. उपसरपंच रामदास चव्हाण ,ग्रामसेवक शशीकिरण जाधव ,सहारा फाउंडेशन निगडी येथील आसिफा बागवा, प्रशिक्षका अनिता ढोरे आणि प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.या प्रशिक्षणाचा लाभ महिलांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!