जांभूळगाव:
इंग्रजी अध्ययन समृद्धी तालुकास्तरीय स्पर्धेत जांभूळ शाळेचा सार्थक सुरेश ओव्हाळ याने प्रथम क्रमांक पटकावला.
पुणे जिल्हा परिषदेच्या दहा कलमी योजनेतील महत्त्वपूर्ण इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रमांतर्गत माळवाडी येथे झालेल्या तालुकास्तरीय WH- question या स्पर्धेत जांभूळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या सार्थक सुरेश ओव्हाळ इयत्ता ४थी तील हा विद्यार्थी आहे.
बक्षीस वितरण समारंभास पंचायत समिती मावळचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे,शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळूंज, सर्व केंद्रांचे केंद्र प्रमुखउपस्थित होते.
जांभूळ शाळा ही उपक्रमशील शाळा असून विविध स्पर्धांमध्ये सातत्याने यश संपादित करत असते.सार्थकला वर्गशिक्षिका कविता जोशी यांनी मार्गदर्शन केले.जांभूळ येथील सरपंच,उपसरपंच,शा.व्य.समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी स्पर्धेतील यशाबद्दल सार्थकचे अभिनंदन केले.स्पर्धेतील यशाने समाधान वाटल्याचे मत केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी व्यक्त केले.सार्थकच्या चमकदार कामगिरीने जांभूळ परिसरात आनंद व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!