वडगाव मावळ:
सरकारने खाजगी सावकरासारखे वागू नये असा हल्ला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महाविकास आघाडीवर चढवला. निमित्त होते मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे वाढीव वीजबील व कृषी पंप वीज तोडणी विरोधात वडगाव मावळ चौकात पुणे-मुंबई महामार्गवर माजीमंत्री भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांंच्या नेतृत्वात रास्ता रोको करून महावितरणाच्या भोंगळ कारभारा विरोधात आक्रमक आंदोलन केले यावेळी भेगडे बोलत होते.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घ्याल, तर गाठ आमच्याशी आहे असा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी दिला.
मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांचे तोडण्यात आलेले शेती पंपाचे वीज कनेक्शन तात्काळ पूर्ववत करावे या संदर्भात आज भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढुन निषेध व्यक्त केला.
कोरोना महामारीमुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबील वसुली व वीज कनेक्शन तोडण्याचे काम या महावसुली सरकारकडून सुरू आहे.
ती तात्काळ थांबविण्यात येऊन शेतकऱ्यांना मागील दोन वर्षाचे शेती पंपाचे वीजबील माफ करावे व ज्या शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्यांचा तात्काळ वीजपुरवठा पूर्ववत करून घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हाता तोंडाशी आलेलं पीक पाण्याविना वाया जाणार नाही.
वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत केला नाही तर शेतकऱ्यांचे पीक वाया जाईल या चिंतेने शेतकरी मानसिक व आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेला असून हे जर पीक पाण्याविना जळून गेले तर शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिकच गडद होईल व त्यामधूनच शेतकरी आत्महत्या होण्याच्या दुर्घटना देखील होऊ शकतात त्यामुळे असाअनुचित प्रकार घडू नये व शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाण्यावाचून जळून जाऊ नये यासाठी तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी महावितरण चे उप कार्यकारी अभियंता सूर्यवंशी साहेब यांच्याकडे करण्यात आली.
शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन तात्काळ पूर्ववत केले जाईल. ज्या विजबिलामध्ये दुरुस्ती असेल ते दुरुस्त्या करून शेतकऱ्यांना टप्याटप्याने चालु बील भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
शेतकऱ्यांची वीजबील दुरुस्ती व वीज कनेक्शन जोडले नाही तर,पुढील आठ दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा महावितरणला देण्यात आला.
या आंदोलनात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,प्रभारी भास्करराव म्हाळसकर,माजी सभापती निवृत्ती शेटे,माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप काकडे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे,गणेश धानिवले,सुनील चव्हाण,मच्छिंद्र केदारी,किरण राक्षे,अनंता कुडे,नारायण बोडके,सूर्यकांत सोरटे,रोहीदास असवले, अरुण .कुटे,अमोल भोईरकर,नितिन घोटकुले,बाळासाहेब घोटकुले,संतोष बांदल,गणेश ठाकर,सागर शिंदे,माऊली आडकर,यादव सोरटे,प्रवीण शिंदे यांच्यासह शेतकरी व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!