आदर्श शिक्षक तानाजी शिंदे यांचा घोरावडेश्वर डोंगरावर सत्कार
सोमाटणे:
पुणे जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भोयरे शाळेतील शिक्षक तानाजी शिंदे यांचा सांगाती सह्याद्रीचे शिक्षक परिवाराच्या वतीने घोरावडेश्वर डोंगरावर ‘पवित्र गाथा ग्रंथ’ देऊन सत्कार करण्यात आला.
महाशिवरात्रीचे औचित्य साधून हा सन्मान करण्यात आला.यावेळी सांगाती सह्याद्रीचे ग्रुपचे अध्यक्ष सुनिल साबळे,माजी चेअरमन राजू भेगडे,सोपान असवले,माजी कार्याध्यक्ष अजित नवले,केंद्रप्रमुख रघूनाथ मोरमारे,उमेश माळी उपस्थित होते.
तानाजी शिंदे हे मूळचे इंगळूण या गावचे असून त्यांचे कुटूंब धार्मिक कार्यात नेहमी हिरीरीने सहभाग घेते.जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा गाथा हा ग्रंथ जीवन कसे जगावे हे शिकवतो.तसेच या ग्रंथातील अभंग हे सद्वर्तनी राहण्याची शिकवण देतात,असा विश्वास माजी चेअरमन राजू भेगडे यांनी दिला.
जिल्हा पुरस्कार प्राप्तीबद्दल तानाजी शिंदे यांचा यापूर्वी भोयरे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वृंदांनीही सन्मान केला.

error: Content is protected !!