
मळवंडी ढोरे शाळेत विज्ञान प्रदर्शन
मळवंडी ढोरे:
मळवंडी ढोरे शाळेमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. इ.१ ली ते इ.७ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले..वनस्पतींची वाढ,वनस्पतींचे अवयव,मानवी शरीर रचना,सजातीय विजातीय विद्युत प्रभार,सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे,पदार्थाची घनता व आकारमान,फुलांचे विविध भाग,वस्तुंचे वजन व आकारमान इ.अनेक प्रयोग विद्यार्थ्यांनी स्व प्रयोगातून सादर केले व प्रयोगाची माहिती सांगितली.
शालेय व्यवस्थापन समिती व पालकांच्या वतीने उपाध्यक्ष रेणूका तरस,पोपट ढोरे,अनिल ढोरे,योगेश ढोरे,धनश्री ढोरे,माधवी शिंदे,सारीका ढोरे,झामाबाई ढोरे,प्रिया ढोरे,राजश्री ढोरे इ.पालकांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
नियोजन व मार्गदर्शन मुख्याध्यापक राजू भेगडे व शिक्षक सोमलिंग रेवणशेट्टे,साधना बो-हाडे,पूजा राऊत यांनी केले.
- कोथुर्णेच्या पिडीतीला न्याय कधी?आमदार सुनिल शेळके विधी मंडळात कडाडले
- कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार असल्यामुळे नागरिकांची प्रवासा दरम्यान होणार तारांबळ
- आढले बुद्रुक येथे ३६ फूट ध्वज स्तंभाचे अनावरण
- विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने शिरगावात शेतकऱ्याचा मृत्यू
- पर्वती माणकु काळे यांचे निधन



